धामणगावात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे जल्लोषात स्वागत…. चार हजार नागरिकांची उपस्थिती,आ प्रताप अडसड यांना डोक्यावर घेऊन नाचले कार्यकर्ते…

धामणगावात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे जल्लोषात स्वागत….
चार हजार नागरिकांची उपस्थिती,आ प्रताप अडसड यांना डोक्यावर घेऊन नाचले कार्यकर्ते…

MB-NEWS (प्रदीप भुसारी धामणगाव रेल्वे, प्रतिनिधी):-विदर्भाच्या अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे धामणगावात ढोल ताश्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले दरम्यान यावेळी आ प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी दहा किमी ची मोटरसायकल रॅली काढली.

नागपूर- शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण रविवारी नागपुरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले याचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील जनतेला पाहता यावे यासाठी आ प्रताप अडसड यांनी समृद्धी महामार्ग लगत तालुक्यातील आसेगाव- सावळा फाटा नजीक एका एकरात मंडप उभारून डिजिटल स्क्रीन वर लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अरुणभाऊ अडसड, खा अनिल बोडे, आ प्रवीण पोटे आ प्रताप अडसड, आ बाजोरिया, आ ससाने,जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघाडे ,माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, शिवराय कुलकर्णी रमेश मावसकर, दिनेश सूर्यवंशी,तृषार भारतिय, चेतन गावंडे प्रशांत शेंगोकारसुरेखा शिंदे, रवींद्र मुंदे यांची उपस्थिती होती.

ढोल ताशाच्या गजरावर थीरकले आमदार खासदार

महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलविणाऱ्या या समृद्धी महामार्गाचा ऐतिहासिक सोहळा नागपुरात सुरू होण्यापूर्वी ढोल ताशाच्या गजरात आमदार खासदारानी नृत्य केले आमदार प्रतापदादा अडसड यांच्यामुळे हा ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेऊन नृत्य केले

समृद्धीच्या ७३ किमीवर सजावट

समृद्धीचा इंटरचेंज मार्ग पासून दोन्ही अश्या किमी ७३ आसेगाव- शिवणी टोल नाकापर्यंत भव्य सजावट सह भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले होते प्रत्येक फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या आभाराचे फलक आ प्रताप अडसड यांच्या वतीने लावण्यात आले होते

दहा कि.मी. ची मोटरसायकल रॅली

महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचे नवे पर्व ठरणारा समृद्धीमहामार्गाचे लोकार्पण होत असल्याने रविवारी सकाळी ८ वाजता भाजप तालुका, शहराच्या वतीने जुना धामणगाव येथून आ प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत मोटर सायकल रॅली काढण्यात आली गावा-गावातील कार्यकर्त्यानी मोटर सायकल घेऊन या रॅलीत सहभाग घेतला होता वंदे मातरम, भारत माता की जय घोषणात ही रॅली शहरातून मार्गक्रमन करीत सावळा फाटा आसेगाव कार्यक्रम थेट प्रक्षेपण स्थळी पोहचली

चार हजार ग्रामस्थांची उपस्थिती

राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वात जास्त लांबीच्या वेगवान महामार्गाचे लोकार्पण सोहळा होत असल्याने धामणगाव रेल्वे ,चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर यासह जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती तब्बल एक एकरात उभारलेल्या या मंडपात चार हजार महिला पुरुष सोबतच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विदर्भ,मराठवाडा अति दुर्लक्षित भाग ओळखला जातो आता हा भाग समृद्धीमुळे मोठ्या बाजारपेठेला जोडला गेला यापूर्वी भाजीपाला फळे हे नाशीवंत वाहतुकीमुळे पोहचू शकत नव्हते या महामार्गामुळे मोठ्या शहरात पोहोचणार आहे खऱ्या अर्थाने दोन्ही भागासाठी हा महामार्ग समृद्धी ठरणार आहे.

प्रताप अडसड,आमदार धामणगाव रेल्वे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे