भावी सरपंच स्वप्नपूर्तीत* *गुरफटले ! #तालुक्यात ग्रामपंचायत* *निवडणुकीची रणधुमाळी सुरू # *प्रशासन सुद्धा लागले कामाला # *राजकीय पक्षांकडून* *मोर्चेबांधणी

भावी सरपंच स्वप्नपूर्तीत* *गुरफटले !
#तालुक्यात ग्रामपंचायत* *निवडणुकीची रणधुमाळी सुरू
# *प्रशासन सुद्धा लागले कामाला
# *राजकीय पक्षांकडून* *मोर्चेबांधणी

 

MB-NEWS (नांदगाव खंडेश्वर/ पवन ठाकरे, प्रतिनिधी):-नांदगाव खडेश्वर तालुक्यातील 16 ग्रामपंचात निवडणुकीचे 18 डिसेंबरला मतदान होणार असून, 20 डिसे.रोजी त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे या निवडणुकीमध्ये मुख्य लढाई ही थेट सरपंचपदाची होणार आहे. राजकीय पक्षांनी सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केल्याने सोशल मीडियावर जनतेच्या मनातला सरपंच, कार्यसम्राट सरपंच आणि आपलाच भाऊ, भावा होणार सरपंच अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल करून आपल्या उमेदवाराची जनमाणसात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांमधून केल्या जात आहे. असल्या अविर्भावात असलेल्या कार्यकर्त्यांमुळे सरपंचपदाच्या स्वप्नपूर्तीत उमेदवार गुरफटल्याचे चित्र आहे.
—————————————-
( चौखट )

गावाच्या विकासकामांबाबत तोंडावर बोट
————————————–
शासन निर्णयानुसार पहिल्यांदाच लोकनियुक्त सरपंच होणार राजकीय पक्षांनी कंबर कसली
आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच प्रत्येक उमेदवार आपापल्या पध्दतीने दूरध्वनी आणी प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष असू द्या, असा संवाद साधत मतांची अप्रत्यक्षरीत्या मागणी जनतेकडून करत असल्याचे समजते. परंतु हे सारे करूनही विकासाची कामे होणार का, असा वर्षानुवर्षे सतावत आलेला प्रश्न सर्वसामान्य जनतेला यंदाच्या निवडणुकीच्या
रणधुमाळीतही सतावू लागला आहे. नाक्या-नाक्यांवर, गल्लीबोळात, वाडी नगरात आणी दैनंदिन प्रवासातही उमेदवाराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यात आपल्या मर्जीतल्या उमेदवाराचे कौतुक आणि विरोधी गटातील
उमेदवाराची दवंडी पिटायची अशा चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या वातावरणात रमलेली मंडळी गावच्या खुंटलेल्या विकासकामावर
चकार शब्द देखील काढायला तयार नाहीत.
—————————————
( चौखट )

ग्रामपंचायत क्षेत्रात विकासकामांचा बोजवारा
—————————————-
नांदगाव खडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आजही विकासकामांचा बोजवारा कायम आहे. आठ दिवसांनी केला जाणारा पाणीपुरवठा, अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, नाले- गटारांची दुरवस्था आणि आरोग्य अशा विविध समस्या आजही मार्गी लागलेल्या नाहीत. हेच भांडवल घेऊन यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा व्यासपीठावरून परंपरेनुसार समस्यांची गुरळ सोडविण्याचे आश्वासन राजकीय नेते व उमेदवारांकडून जनतेला दिले जाणार यात शंकाच नाही.

उमेदवारांची कसोटी लागणार

—————————————
स्थानिक प्रशासनाच्या व्यवस्थापनेत अद्याप समस्यांच्या गर्तेत अडकलेला विकासाचा मुद्दा खोडण्यात लोकप्रतिनिधींना सपशेल यश आल्याचे सुज्ञ नागरिकांच्या तोंडून बाहेर पडत आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या रिंगणात कोण उमेदवार तग घरेल हे जनतेच्या मतदान प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे.
—————————————-
( चौखट )

तालुक्यात या 16 ग्रामपंचायती मध्ये होणार निवडणूका
—————————————-
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोदोरी (मारूफ), खिरसाना,माहुली (चोर), साखरा, पुसनेर,वडाळा, खेड ( पिंप्री), सावनेर, रोहना, पिंपळगाव(बैनाई ),सेलुगुंड,येवती, लोहोगाव, काजना,पाळा,आणि भगुरा या 16 ग्राम पंचायतीमध्ये निवडणूक पार पडणार असून या 16 ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना ऐकून 135 सदस्यांना निवडून द्यावे लागणार असून आपल्या गावच्या विकासाची धुरा त्यांच्यावर सोपवली लागणार आहे त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आणि उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेली दिसून येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे