Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दिनांक 12/12/2022 रोजी पेट्रोलिंग दरम्यान सकाळी पो.स्टे मंगरूळ दस्तगीर हद्दीमधील नागपूर औरंगाबाद रोडवर भातकुली पुलाजवळ अवैध विनापरवाना दारूची रेड करण्यात आली.

दिनांक 12/12/2022 रोजी पेट्रोलिंग दरम्यान सकाळी पो.स्टे मंगरूळ दस्तगीर हद्दीमधील नागपूर औरंगाबाद रोडवर भातकुली पुलाजवळ अवैध विनापरवाना दारूची रेड करण्यात आली.

MB-NEWS( धामणगाव रेल्वे,प्रदीप भुसारी प्रतिनिधी):-दिनांक 12/12/2022 रोजी पेट्रोलिंग दरम्यान सकाळी पो.स्टे मंगरूळ दस्तगीर हद्दीमधील नागपूर औरंगाबाद रोडवर भातकुली पुलाजवळ अवैध विनापरवाना दारूची रेड करण्यात आली.या रेडमध्ये झेनॉन पिकप गाडी मध्ये मागील बाजूस भाजीपाल्याचे कॅरेट व त्याच्या आत मध्ये अवैधरित्या देशी दारू लपवलेली मिळून आली. रेड मध्ये देशी दारु टॅंगो पंच किंमत – 1,40,000/- रू, प्लास्टिक कॅरेट – 3000/- रू, झेनॉन पिकप MH 49 D 3531 किंमत 7,00,000/- रू Vivo Y22 मोबाइल किंमत 14000/- रू असा एकूण 8,57,000/- रू चा मुद्देमाल आरोपी रुपेश शंकर दिवे वय 35 वर्ष धंदा ड्रायव्हर रा हिंगणघाट जि. वर्धा याचे कडून पंचनामा कारवाईप्रमाणे जप्त करण्यात आला. अटक आरोपीचे म्हणणे नुसार सदर अवैध दारू धुळे येथून आणण्याचे रॅकेटमध्ये आकाश उर्फ टिनू गवळी संत कबीर वाड हिंगणघाट, दिनेश गायकवाड रा जिल्हा धुळे, दिनेश एंडाळे रा वर्धा, सुमित चिंतलवार रा नागपूर असे सहभागी दारू माफिया सहभागी असल्याचे सांगितले आहे. जप्त अवैध दारू ही ग्रामपंचायत निवडणुकीचे पार्श्वभूमीवर दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हा व हिंगणघाट तालुक्यामध्ये जात होती. मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धावे दणाणले आहेत. सदरची रेड कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगड साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव साहेब यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुरज तेलगोटे, पोहा अवधूत शेलोकार, सफौ सुधाकर गवइ, नापोशी सुनील उडाके, पोशी संदीप पाटील, सतीश ठवकर यांनी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे