Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

!!परमपूज्य गुरुदयाल उपाख्य भय्यासाहेब यशवंतराव चतुर महाराज सावंगा विठोबा कालवश !!

!!परमपूज्य गुरुदयाल उपाख्य भय्यासाहेब यशवंतराव चतुर महाराज सावंगा विठोबा,कालवश !!
परमपूज्य गुरुदयाल यशवंतराव चतुर महाराज सावंगा विठोबा
परमपूज्य कृष्णाजी महाराज सावंगा विठोबा संस्थानचे सातवे गादीपती परमपूज्य यशवंत चतुर महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव गुरुदयाल चतुर महाराज यांचे दिनांक १४/१२/२०२२ बुधवारी रोजी दुपारी निधन झाले
परमपूज्य गुरु दयाल चतुर महाराज हे कृष्णाजी महाराजांचे वंशज चतुर परिवार यापैकी एक वंशज होते त्यांची कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयावर अढळ श्रद्धा होती व त्या वांग्मयाचे हे अभ्यासक होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयाचा अखंड ध्यास, अभ्यास ,चिंतन, उलगडा व प्रसार या बाबीकडे प्रकर्षाने लक्ष दिले चतुरपती भजनाच्या माध्यमातून चतुर् पती नाम व कृष्णाजी महाराजांचा विचार घरोघरी पोहोचला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता कृष्णाजी महाराजांच्या भाविका बरोबर जवळीक साधून चतुर पती नामाची नवी दृष्टी त्यांनी भाविकांना दिली
प्रतिकूल शारीरिक परिस्थितीमध्ये त्यांनी भाविका बरोबरचा संपर्क व नामाची ओढ कमी होऊ दिली नाही आपल्या अभ्यासपूर्ण बोलण्यातून त्यांनी भाविकांमध्ये चतुरपती नामाची तेवत ठेवली व भाविकांना डोळस श्रद्धेचे धडे दिले कृष्णाजी महाराजांचा विचार हा जगासमोर पोहोचला पाहिजे त्याचा प्रसार झाला पाहिजे कृष्णाजी महाराजांच्या विचाराने भाविक एकत्र रहावे, सावंगा गावचा विकास होऊन सावंगा गाव जगासमोर यायला पाहिजे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते तसेच सावंगा गावचे सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवले कृष्णाजी महाराजा सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगे महाराज ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांचे आदर्श होते.. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अधीपुरूष, चार मुली, जावई भाऊ गोविंद महाराज, सून व नातू असा आप्त परिवार आहे
बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे