Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदूररेल्वे तालुक्यातील १६ ग्रा. पं. निवडणूकीत ७९.९३ टक्के मतदान

चांदूररेल्वे तालुक्यातील १६ ग्रा. पं. निवडणूकीत ७९.९३ टक्के मतदान….

MB-NEWS (चांदूर रेल्वे ):-चांदूर रेल्वे तालुक्यातील १६ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता. १८) शांततेत पार पडले. या निवडणुकीत एकुण १८ हजार १७६ मतदार होते. त्यापैकी १४ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन ७९.९३ टक्के मतदान झाले आहे. तर ४७ सरपंच पदाचे व २०९ ग्रा.पं. सदस्य पदाचे उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिन मध्ये बंद झाले आहे.

१६ ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी ४७उमेदवार व १२९ ग्रा.पं.सदस्यासाठी २०९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर सांवगी संगम ग्रा.पं. निवडणूक अविरोध झाली असुन सरपंच म्हणून पंकज शिंदे व सावंगी संगम येथील सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. तसेच इतर ग्रा.पं.चे १९ उमेदवार अविरोध निवडून आले आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव (७३.८३ टक्के), राजना (७८.७८), बागापूर ( ८३.९४), कोहळा ( ७९.६०), भिलटेक (८९.०३), धोत्रा ( ७९.७९),(७८.५२ ), टेंभूर्णी (७५.४७), मांजरखेड कसबा ( ७३.५९), कवठा कडू (८२.६३), कळमगाव (८१.४३), टोंगलाबाद ( ८६.३६), दिघी कोल्हे ( ८४.२४), मांडवा (७९.०५), कळमजापूर ( ८३.३९ टक्के) दहिगाव धावडे (८१.४१), निंभा मतदान झाले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील १६ ग्रा.पं.चे ४७ सरपंचपदाचे व १२९ सदस्यपदासाठीचे २०९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिन मध्ये बंद झाले आहे.

या सर्व ग्रा.पं.ची मतमोजणी दिनांक 20 मंगळवारी  होणार आहे.

ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी चांदूर रेल्वेचे ठाणेदार सुनिल किनगे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसिलदार अजय बनारसे, लक्ष्मीकांत तिवारी, सुधाकर अनासाने, केशव मळसने, झोनल अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी, आणि तसेच चांदूररेल्वे तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी आपली निवडणूक वेळी पूर्णपणे जबाबदारी बजावली…

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे