Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदूर रेल्वे तालुक्यात अनैतिक संबंधातून सातेफळ येथील अमित उपाध्याय ची हत्या

चांदूर रेल्वे तालुक्यात अनैतिक संबंधातून सातेफळ येथील अमित उपाध्याय ची हत्या…

पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीमध्ये आज दिनांक २०/१२/२०२२ रोजी सकाळी ०६:०० वाजता पोलीस पाटील राजना यांनी माहिती दिली की, एक अनोळखी इसम हा रक्ताच्या थारोळयामध्ये मरुन पडलेला आहे, अशा माहितीवरुन लागलीच घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी केली असता एक अनोळखी इसम हा मरुन पडलेला दिसला त्याचे डोक्यावर गालावर मार असल्याचे प्राथमिकदृष्टया दिसुन आले, वरुन मृतकाची आजुबाजूला गावांमध्ये ओळख पटविण्यासाठी तपास सुरु केला असता सदर मृतक हा ग्राम सातेफळ पोस्टे तळेगाव येथील अमित नारायण उपाध्याय वय ३८ वर्षे असे असल्याचे समजले, त्याचे नातेवाईक त्याची आई नामे चंदाबाई नारायण उपाध्याय यांनी पोस्टेला दिलेल्या रिपोर्टवरुन गुन्हा क्र. ६३१/२२ कलम ३०२, ३४ भा.द.वि दाखल करण्यात आला. यामध्ये मृतक हा दिनांक २०/१२/२०२२ रोजी शंकर नेवारे याचे घरी रात्री ०१:०० वाजताचे सुमारास आला त्यामध्ये त्यांचे वाद विवाद झाले सदर वाद विकोपाला जावून आरोपी नामे १) शंकर मारुती नेवारे वय ४५ वर्षे, २) पियुष शंकर नेवारे वय २० वर्षे व ३) गौरव शंकर नेवारे वय १९ वर्षे सर्व राहणार राजना यांनी त्याला दगड व बांबुच्या काठयांनी मारहाण करुन जिवे मारले आहे. यातील मृतक अमित उपाध्याय व आरोपी शंकर नेवारे याची पत्नी यांचेमध्ये मागील एक वर्षांपासुन प्रेमसंबंध होते व सदर महिला ही मृतकसोबत एक वर्षापासुन राहत असल्याने त्याचा राग मनात धरुन सदरचा खुन आरोपींनी संगणमताने केलेला आहे. खुन केल्यानंतर सर्व आरोपी हे पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना ग्राम राजना येथुन चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनिल किनगे, सपोनि अनिल पवार, सपोनि मनोज सुरवाडे, पोहेका संतोष मोरे, पोकॉ अरविंद गिरी, रवि भुताडे, योगेश नेवारे, चांदु गाडे यांनी शिताफीने अटक केली..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे