Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

घरकुलासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी “आप” चा नागपूर अधिवेशनावर मोर्चा,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा – राज्य प्रवक्ता नितीन गवळींचे आवाहन.

घरकुलासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी “आप” चा नागपूर अधिवेशनावर मोर्चा,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा – राज्य प्रवक्ता नितीन गवळींचे आवाहन.

MB-NEWS (चांदूर रेल्वे) – पंतप्रधान घरकुल आवास योजनेसह सर्व महत्वाचे प्रश्न सोडवा या मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर  शुक्रवारी (ता. 23) मोर्चा काढण्यात येणार असुन यात जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन चांदूर रेल्वे न.प. चे माजी उपाध्यक्ष, विदर्भ संघटन मंत्री तथा आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता नितीन गवळी यांनी केले आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी ५० हजार देण्यात यावी, पिक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे, शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे, सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घावेत, अंशकालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे, सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी, खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करावा आदी मागण्यांकरिता सदर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मार्चा प्रदेश संयोजक रंगाजी राचुरे यांच्या नेतृत्वात व धनराज वंजारी, हरिभाऊ राठोड, विजय कुंभार, धनंजय शिंदे, कुसुमकार कौशिक, संदीप देसाई, जगजितसिंग, किशोर मांध्यान, डॉ. फैजी, देवेंद्र वानखडे, संजय कोल्हे, अशोक मिश्रा, शेख अन्सार, डॉ. केशव बांते, अविनाश श्रीराव, अमीनभाई, मनोहर पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सरकारला आधीच देण्यात आला होता. त्याच अनुशंगाने सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन जास्तीत जास्त कार्यकर्तेे, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता नितीन गवळी व इतरांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे