Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

लग्न समारंभ, मेळावे पुढे ढकला, कोरोनासंदर्भात IMA ने केल्या मार्गदर्शक सूचना जारी..

लग्न समारंभ, मेळावे पुढे ढकला, कोरोनासंदर्भात IMA ने केल्या मार्गदर्शक सूचना जारी..

▪️ अनेक देशांमध्ये कोरोना प्रकरणांची अचानक वाढ होत असताना, इंडियन मेडिकल असोसिएशनने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यूएसए, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्राझील यांसारख्या प्रमुख देशांमध्ये गेल्या 24 तासांत जवळपास 5.37 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

▪️मागील 24 तासांत भारतात 145 नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी चार रुग्ण हे BF.7 हे कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची आहेत. तसेच या संदर्भात आयएमएने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शिका जारी केली आहे.

💥 आयएमएच्या नवीन मार्गदर्शिका खालीलप्रमाणे –

1. लग्न समारंभ, सार्वजनिक मेळावे पुढे ढकलण्यात यावेत
2. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे
साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरण्यास सुरुवात करा.
3. सोशल डिस्टन्स पाळावा
4.शक्यतो आंतरराष्ट्रीय प्रवास करणे टाळा.
5. सर्दी, खोकला, सर्दी यांसारखी लक्षणे दिसत असल्यास कोरोना चाचणी करुन घ्या.
6. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे.

▪️सध्या परिस्थिती चिंताजनक नाही आणि त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. उपचारापेक्षा काळजी घेणे चांगले आहे. म्हणून, सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, आगामी काळात कोविड प्रादुर्भावावर मात करण्यासाठी वरील आवश्यक पावले उचलावीत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे