Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नव्या वर्षात ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक; प्रति युनिटसाठी इतके पैसे मोजावे लागणार..?

नव्या वर्षात ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक; प्रति युनिटसाठी इतके पैसे मोजावे लागणार..?

▪️ ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ कंपन्यांनी दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगापुढे फेर आढावा याचिका सादर केल्या आहेत. या याचिकांना मंजुरी मिळाल्यास वीज ग्राहकांवर प्रति युनिट एक रुपया ३५ पैशांचा बोजा पडणार आहे. त्यातच ‘महावितरण’कडूनही दरवाढीची मागणी केली जाणार असल्याने, नव्या वर्षात नागरिकांना वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे.

▪️ वीजदरनिश्चितीचा आदेश जाहीर
राज्य वीज नियामक आयोगाने ३० मार्च २०२० रोजी पुढील पाच वर्षांसाठी (मार्च २०२५ अखेर) बहुवर्षीय वीजदरनिश्चितीचा आदेश जाहीर केला आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज कंपन्यांना फेर आढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार, ‘महानिर्मिती’ व ‘महापारेषण’ या दोन कंपन्यांनी दरांच्या फेर आढाव्यासाठी याचिका आयोगापुढे दाखल केल्या आहेत.

▪️ महानिर्मिती’ची मागणी
‘महानिर्मिती’ कंपनीने मागील चार वर्षांतील जादा खर्च व येणाऱ्या दोन वर्षांतील अपेक्षित जादा खर्च यासाठी पूर्वी आयोगाने मंजूर केलेल्या रकमेव्यतिरिक्त एकूण २४ हजार ८३२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीची मागणी केली आहे. आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास त्याचा ग्राहकांवरील सरासरी परिणाम एक रुपया तीन पैसे प्रति युनिट याप्रमाणे होणार आहे.

▪️ ‘महापारेषण’ची मागणी
‘महापारेषण’ कंपनीने मागील खर्चातील वाढ व पुढील दोन वर्षांतील जादा खर्च यासाठी एकूण फरकाची वाढीव मागणी सात हजार ८१८ कोटी रुपयांची केली आहे. आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास त्याचा ग्राहकांवरील परिणाम सरासरी ३२ पैसे प्रति युनिट याप्रमाणे होणार आहे. या दोन कंपन्यांची एकूण दरवाढ मागणी एक रुपया ३५ पैसे प्रति युनिट याप्रमाणे आहे. याशिवाय ‘महावितरण’ कंपनीकडूनही दरवाढीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे वीजबिलात प्रचंड वाढीचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे