समर्थ श्री संत डोंगरपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र तळेगाव ठाकूर येथे संपन्न झाला.

समर्थ श्री संत डोंगरपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र तळेगाव ठाकूर येथे संपन्न झाला.

MB-NEWS सुनील घोडमारे (तिवसा):-समर्थ श्री संत डोंगरपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र तळेगाव ठाकूर येथे संपन्न झाला. यामध्ये ध्वजारोहण तीर्थ स्थापना ध्यान प्रार्थना कीर्तन प्रवचन व रोगनिदान शिबिर महिला मेळावा होम हवन तसेच श्री समर्थ कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचा समारोप श्रीच्या पालखीचे मिरवणूक व शोभायात्रा नंतर ह भ प श्री मनोज महाराज सुंदरकर यांचे गोपाल काल्याचे किर्तन झाले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती पुष्पमाला उर्फ माईसाहेब ठाकूर सरिताताई देशमुख राजीव काका ठाकूर दिलीपराव काळबांडे , डॉ रघुनाथजी वाडेकर, कल्पनाताई दिवे , सतीशभाऊ पारधी दर्शनाताई मारबदे किशोरभाऊ दिवे व आदी पाहुणे मंडळी उपस्थित होते त्यानंतर महाप्रसाद वितरनाणे कार्यक्रमाचा शेवट झाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे