नवनिर्वाचित कॉग्रेसचे सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना  ग्रामविकासाच्या टिप्स,सत्कार आणि मार्गदर्शन; काँग्रेस कमिटीचे चांदुर रेल्वे येथे आयोजन…

नवनिर्वाचित कॉग्रेसचे सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना  ग्रामविकासाच्या टिप्स,सत्कार आणि मार्गदर्शन; काँग्रेस कमिटीचे चांदुर रेल्वे येथे आयोजन…

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :– सचिव हा ग्राम पंचायतीचा मालक नसतो, सरपंच उपसरपंच, ग्रा प सदस्य हेच खरे मालक असतात, ग्रामपंचायतिच्या योजना समजून घ्या व आपल्या गावाचा विकास करा, या शिवाय ग्रामसभा ही महत्वाची व आपल्या हक्काचे व्यासपीठ त्याला उपस्थीत राहून ग्राम पंचायत चा कारभार समजून घ्या असे व अनेक ग्रामविकासाच्या टिप्स देत नव्यानेच निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांचा काँग्रेस कमिटी व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, प्रा वीरेंद्र जगताप, उत्तराताई जगताप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाने, सभापती सुरेश निमकर, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अमोल होले, नांदगाव चे निशिकांत जाधव, धामणगाव चे पंकज देशमुख, बाजार समितीचे श्रीकांत गावंडे, आदी उपस्थित होते. यावेळी तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांना ग्रामविकासाच्या अनेक योजनांची माहिती दिली, ग्राम पंचायत मध्ये सचिव यांचा कारभार कसा चालतो आपल्याला कुठल्या बाबी समजावून घेतल्या पाहीजे, घरकुल योजना, कृषी योजना, रोजगार हमी योजना, बांधकाम अशा अनेक योजनांची माहिती व त्यावरील मार्गदर्शन केले, मतदार संघातील तीनही तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सरपंच आणि सदस्य यांनी अनेक प्रश्न विचारून त्यावर आपले समाधान करून घेतले. कार्यक्रमाला काँग्रेस चे तीनही तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्राम पंचायत मध्ये मतदार संघातील तीनही तालुक्यातील ४२ सरपंचान पैकी २८ सरपंच आणि जवळपास २५० ग्रा प सदस्य यांचा सत्कार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला, याशिवाय काँग्रेस चे सर्वच आजी माजी सदस्य पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित असल्याचे काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे