रस्त्याच्या मध्यभागी येणारे विद्युत पोल व तार हटविण्यात यावे संबधित अधिकारी व कंत्राटदार वर कारवाई करण्यात यावी
MB-NEWS (नांदगाव खंडेश्वर पवन ठाकरे ता. प्र.):-
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे बेंबळा प्रकल्प अंतर्गत 2 कोटी 87 लाख 54 हजार 160 मंजुर झाले असून या निधी मधून धामक ते कुरेगाव या शेतकरी वहीवाट असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे .
महादेव मंदिर समोर हायटेंशन विघुत पोल हा सिमेंट रस्त्याच्या मध्यभगी येत आहे ठेकेदारांनी काम सुरू करण्याच्या पूर्वी हायटेन्शन लाईनच्या विद्युत पोल व तारेचे शिफ्टिंग करावयास पाहिजे होते परंतु त्यांनी तसे न करता सिमेंट रस्त्याचे काम सुरू केले आहे या पोल मुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना जण्या येण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामूळे या हायटेन्शन लाईन मुळे कुणाला अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न पडला आहे या कामामुळे गावातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
सिंमेट रस्याची उंची वाढलेली आहे त्यामुळे हायटेन्शन लाईनचे तार रोड क्रॉस करत आहे त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो विद्युत पोल सुद्धा रस्त्याच्या मधोमध येत आहेत त्यामुळे संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार सा.बा.विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्यापूर्वी करून नंतरच हे काम सुरू करायचे होते परंतु त्यांनी तसे न करता हे काम सुरू केले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारवर आणि स.बा.विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.याकरिता आपण संबंधित विभागा च्या वरिष्ठा कडे लवकरच तक्रार करणार आहोत.
(प्रविण स चौधरी)
माजी संरपच ग्रा प धामक
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मा तालुका प्रमुख नांदगाव खंडेश्वर.

