हायवेवर रोही आडवा आला अन कार गेली थेट शेतात. तळेगाव ठाकूर फाट्यावरील घटना.

हायवेवर रोही आडवा आला अन कार गेली थेट शेतात.
तळेगाव ठाकूर फाट्यावरील घटना.

MB-NEWS( गुरुकुंज मोझरी ) आशिष देशमुख :नागपूर वरून अमरावती कडे जाणाऱ्या कारला हायवेवरील तळेगाव ठाकूर फाट्याजवळ मंगळवारी पहाटे अचानक रोही आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झालेली कार ही थेट बाजूच्या शेतात पलट्या घेत क्षतीग्रस्त झाली.यात मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अंगावर शहारे येणारी ही घटना असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, MH 39,BW 3029 ही कार अमरावतीच्या दिशेने आज पहाटेच्या सुमारास तिवसा मार्गे हायवेने जात होती.अश्यातच या धावत्या कारला अचानक रोही आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाच्या ताब्यातील वाहन हे अनियंत्रित होऊन पलट्या घेत बाजूच्या चण्याच्या शेतात पोहचले असल्याचे उपस्थित काही जणांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.अपघाताची ही घटना अंगावर शहारे आणणारी होती.या अपघातात कारचालकासह एक जण जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.मात्र कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. .शेतात पलट्या घेत क्षतीग्रस्त झालेल्या अपघातग्रस्त कारला पाहण्यासाठी अनेक जणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे