Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा येथील यादव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यादवरावजी उपाध्य अण्णाजी देशमुख यांचा जयंती कार्यक्रम…

तिवसा येथील यादव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यादवरावजी उपाध्य अण्णाजी देशमुख यांचा जयंती कार्यक्रम…

MB-NEWS:- (गुरुकुंज मोझरी)अशिष देशमुख :-तिवसा येथील यादव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यादवरावजी उपाध्य अण्णाजी देशमुख यांचा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.के.देशमुख सर,सचिव,मनीभाई गुजराती शाळा समिती हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा डॉ. बी.आर. वाघमारे, मा.श्री.मधुकरराव रोडे, मा.श्री नानाजी देशमुख, मा.श्री रमेशराव बोके, मा.श्री शंतनु भाऊ देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत देशमुख यांनी केले.यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी परिश्रम करण्यासंदर्भात उपस्थितना आवाहन केले.भाऊसाहेब व अण्णाजींच्या सामाजिक कार्याची व ज्ञानदानाची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुद्धा त्यांनी केले. यानंतर मा. श्री. मधुकरराव रोडे यांनी संस्कार, मूल्य आणि प्रामाणिकपणाचे दाखले देत विकास कामात काम करण्याची गरज आहे, असे विचार स्पष्ट केले. सोबतच श्रमदानाची संकल्पना सुद्धा त्यांनी उपस्थितना सुचवली.त्यानंतर मा.शंतनू भाऊ देशमुख यांनी अण्णाजींच्या स्मृतींना उजाळा दिला व महाविद्यालय स्थापन करतेवेळी आलेल्या समस्यांचा आलेख त्यांनी स्पष्ट केला. यानंतर विचारपीठा वरून बोलताना मा.डॉ.बी.आर.वाघमारे सर यांनी भाऊसाहेब, बाबासाहेब आणि अण्णाजींच्या विचारसादरम्याबाबत उदाहरणे देत शिक्षण हे बहुजनांपर्यंत तसेच सामान्य पर्यंत गेले पाहिजे असे विचार व्यक्त केले यानंतर अध्यक्षस्थानी बोलताना मा.बी.के.देशमुख यांनी शिस्तबद्ध प्रशासनाबाबत विचार स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी.जी.सोळंके यांनी केले तर प्रा.डॉ.एस.एम.गेडाम यांनी सर्व उपस्थितमचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व देशमुख परिवार,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे