Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आज मुबंई  बीकेसी येथे मोदींच्या भाषणातील प्रमुख ११ मुद्दे या भाषणात नेमकं मोदी काय म्हणाले ?

आज मुबंई  बीकेसी येथे मोदींच्या भाषणातील प्रमुख ११ मुद्दे या भाषणात नेमकं मोदी काय म्हणाले ?

MB-NEWS (मुंबई ):-पंतप्रधान नरेंद्र मोदीं सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते 38 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण आणि उद्घाटनानंतर मोदींनी बीकेसीत उपस्थित हजारो नागरिकांना संबोधित केले.

▪️बीकेसीती भाषणाची सुरूवात मोदींनी मराठीतून केली. त्यांच्या या खास सुरूवातीला उपस्थितांनी टाळा वाजवून दाद दिली.

▪️मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

▪️स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

▪️एकनाथ शिंदेंनी दावोसमधला जो अनुभव व्यक्त केला. तसेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे. भारताकडे आशेने पाहिलं जातंय असे ते म्हणाले.

▪️मुंबईला भविष्यासाठी तयार करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.

▪️आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल.

▪️मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी असे म्हणत त्यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

▪️यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेल्याचे मोदी म्हणाले.

▪️शिंदे आणि फडणवीसांची जोडी सत्तेत येताच राज्यात पुन्हा वेगाने काम होऊ लागली आहेत.

▪️डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा देण्याचे काम करत आहे.

▪️कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीसांचे अभिनंदन करतो असे मोदी म्हणाले

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे