Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महत्त्वाची बातमी:-‘समृद्धी’वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा…

महत्त्वाची बातमी:- ‘समृद्धी’वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा…

▪️समृद्धी महामार्गावर अगदी जुनाट कारदेखील १२० किलोमीटर अथवा त्यापेक्षा वेगाने चालविल्या जात असून जुनी वाहने इतकी वेगाने चालविल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याबरोबर टायर गरम होऊन फुटण्याची भीती असते. अशावेळी टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरणे फायद्याचे ठरू शकते, असे निरीक्षण आरटीओ अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

▪️समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे. आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गावर प्रवास करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना दिला आहे. समृद्धी महामार्गावरील इंटर चेंजवर फलकाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.*

▪️जनजागृतीसाठी फलक*

समृद्धी महामार्गाच्या इंटर चेंजवर जनजागृतीच्या दृष्टीने फलक लावण्यात आले आहेत.
▪️वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे. सिटबेल्टचा वापर करावा.
▪️लेनची शिस्त पाळावी. जुने वाहन अतिवेगाने चालवू नये.
▪️वाहन चालविताना मोबाइल वापरू नये.
▪️प्रवास करताना दीड-दोन तासांनी थांबावे.
▪️टायरमध्ये नायट्रोजनचा वापर करावा.

*असे आहेत नायट्रोजन गॅसचे फायदे
▪️ हा गॅस हवेपेक्षा हलका असल्यामुळे टायर फुटण्याचा धोका कमी होतो
▪️ टायर गरम होत नाही
▪️ नायट्रोजन गॅस प्रसारण पावत नाही. त्यामुळे टायरमध्ये एकसारखे प्रेशर राहते
▪️टायर डिस्क गंजत नाही

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे