Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MPSC च्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! – राज्यात होणार एकूण 8169 पदांसाठी भरती

MPSC च्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! – राज्यात होणार एकूण 8169 पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क संवर्गात एकूण आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.

सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार, या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल.

पहा  रिक्त पदे

▪️सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी* – 70 पदे

▪️महाराष्ट्र लोकसेवा आयोग – सहायक कक्ष अधिकारी* – 8 पदे

▪️वित्त विभाग राज्य कर निरीक्षक* – 159 पदे

▪️गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक* – 374 पदे

▪️महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक श्रेणी – 1 / मुद्रांक निरीक्षक* – 49 पदे

▪️गृह विभाग – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क* – 6 पदे

▪️वित्त विभाग – तांत्रिक सहायक* – 1 पद

▪️वित्त विभाग – कर सहायक* – 468 पदे

▪️मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक* – 7034 पदे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे