विनायक विज्ञान महाविद्यालय येथील इंग्रजी विभागाअंतर्गत बी. एस्सी भाग एक च्या विद्यार्थ्यांची खंडेश्वर संस्थांनला भेट.

विनायक विज्ञान महाविद्यालय येथील इंग्रजी विभागाअंतर्गत बी. एस्सी भाग एक च्या विद्यार्थ्यांची खंडेश्वर संस्थांनला भेट.

MB-NEWSनांदगाव खंडेश्वर पवन ठाकरे (प्रतिनिधी):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये पसंतीवर आधारित शिक्षण प्रणाली नव्याने रुजू झालेली आहे. या अभ्यासक्रमामध्ये स्पॉट व्हिजिट या उपक्रमाचा अंतर्भाव बी.एस्सी भाग एक च्या इंग्रजी आवश्यक या विषयात करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने विनायक विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग अंतर्गत बी.एस्सी भाग १ चे विद्यार्थ्यांनी नांदगाव खंडेश्वर नगरीतील पवित्र स्थान असलेल्या श्री क्षेत्र खंडेश्वर संस्थानला दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी भेट दिली .
इंग्रजी विभागाचे प्राध्यापक राजीव तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खंडेश्वर संस्थांना भेट दिली. यावेळी संस्थानचे पूजारी दिवाकर महाराज लांडगे आणि खंडेश्वर संस्थांचे संचालक मंडळातील प्रकाश उडबगले यांनी खंडेश्वर संस्थांचे ऐतिहासिक महत्त्व, वैशिष्ट्ये विशद केले.
नांदगाव खंडेश्वर मधील खंडेश्वराचे देवालय प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण असे असून या देवालयाचे बांधकाम साधारणतः ८०० वर्षापूर्वीचे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील राजा कृष्णदेवराय यांच्या काळात त्यांचा प्रधान हेमांद्रीपंथ याच्या देखरेखित हे मंदिर बांधल्या गेले. या स्थळाचा अभ्यास ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
सदर अभ्यास दौऱ्याकरिता प्राचार्य डॉ. अलका भिसे आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. सुचिता खोडके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये बी.एस्सी भाग एक च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे