वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीचा चांदूर रेल्वेत जल्लोष
MB-NEWS (चांदूर रेल्वे):-वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर व शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी २३ जानेवारी बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीचा ऐतिहासीक घोषणा केली. या युतीचे चांदूर रेल्वे शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात मंगळवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उध्दव ठाकरे गट) पक्षाने फटाके फोडून जल्लोषात जोरदार स्वागत केले.
सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे चौकातील नामफलकाला
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीचा जयघोष करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी चे नारे लावण्यात आले. फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे अमरावती जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड, जिल्हा महासचिव प्रा. रवींद्र मेंढे, चांदूर रेल्वे शिवसेना तालुका प्रमुख राजेश निंबर्ते, शहर प्रमुख स्वप्निल मानकर, सहकार सेना तालुका प्रमुख बंडूभाऊ यादव, उप तालुका प्रमुख कौस्तुभ खेरडे, माजी तालुका प्रमुख त्रिलोकचंद मानकानी, गजानन यादव, संजय चौधरी, सुरेश उरकुडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मिनेश शिंदे, शहर अध्यक्ष केशव केने, सुनिल सोनोने, श्रीकांत भोयर, महिला आघाडी अध्यक्षा बेबीनंदा लांडगे, चंदू उके, गिरीश पवार, पंकज कावळे, अशोक कांबळे, अजय राऊत, विनोद चेंडकापूरे, राज ढोके, उषा मेश्राम, अनिता धवने, हिरू मेंढे, सविता फुलझेले, तुळशीराम धारकर, अनिल इंगोले, दीपक बांबोडे, मारोती तलवारे, बाबाराव मोहोड, यशपाल मोहोड, दिनेश गजभिये, अश्विन पाटील, सुभाष डोंगरे, छोटु गावंडे, अभय रामटेके यांसह शिवसेना (उध्दव ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

