नांदगाव पेठ एम.आय.डी.. सी.परिसरा मध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला…

नांदगाव पेठ एम.आय.डी.. सी.परिसरा मध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला…

MB-NEWS सुनिल घोडमारे(प्रतिनिधी ):-अमरावती जिल्यातील नांदगाव पेठ मधील एका महिलेवर एका महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.ही घटना २५ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता सुमारास घडली.महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचार सुरु आहे.मालती अरुण नागदिवे वय ४५ कापूस तळणी असे जखमीचे नाव आहे.मालती या बुधवारी दुपारी एम आय डी सी परिसरात उभ्या होत्या.यावेळी दुचाकी वरून दोघे त्यांच्या जवळ आले आणी अचानक कुऱ्हाडीने वर केले.त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला.

हा प्रकार तेथील कामगाराच्या लक्षात आले आणी त्यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन ला कळविले .माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले.पंचनामा करून जखमी महिला सामान्य रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे