स्व. मिश्रीलालजी झाडखंडे प्रशासकीय महाविद्यालय,बामादेही व जि. प.शाळा.यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचा व शालेय स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

स्व. मिश्रीलालजी झाडखंडे प्रशासकीय महाविद्यालय,बामादेही व जि. प.शाळा.यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचा व शालेय स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

MB-NEWS(अक्षय अथोटे)मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी:-
चिखलदरा तालुक्यातील बामादेही येथील २६ जानेवारी २०२३ रोजी स्व. मिश्रीलालजी झाडखंडे प्रशासकीय महाविद्यालय,बामादेही व स्व.गोविंद फत्तुजी झाडखंडे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, बामादेही व जि. प. शाळा बामादेही यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेले वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवनलालजी झाडखंडे उपाध्यक्ष श्री. सावण्याजी झाडखंडे श्रीमती.उर्मिला मिश्रीलाल झाडखंडे सचिव, व जि. प.शाळा समितीचे अध्यक्ष श्री.उमेश आठोले व इतर सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत नवनिर्वाचित सर्व सदस्य सरपंच सौ.अर्चना मनोहर इडपाचे. उपसरपंच सौ.भुनेश्वरी विजय हरसुले उपस्थित होत्या स्व.एम.जे.झेड. प्र.महा.चे प्राचार्य श्री.अमित बेलकर सर स्व.जि.एफ.झेड. माध्य.विद्यालय, बामादेही चे प्राचार्य,श्री.कृष्णा सुरजाये सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमुख श्री यावले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जि. प माध्यमिक शाळा बामादेही यांनी केले. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवनलालजी झाडखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सलग चार तास अतिशय शांततेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या नृत्य कला पाहण्यासाठी गावातील समस्त पालक वर्ग व गावकरी तसेच आजी-माजी विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अरविंद भोपले सर आणि श्री.प्रकाश सुरजाये यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्री.शुभम ठाकूर सर आणि जयकुमार झाडखंडे, तेजस सुरजाये व अक्षय अथोटे यांनी केले. तसेच श्री. शाम थेलकर सर, श्री.अनिल तोटे सर श्री.श्रीकांत झाडखंडे सर श्री. जगदीश कोगे सर श्री. युवराज बिसंदरे सर श्री. राजेंद्र बिसोने सर श्री. आकाश बेलकर सर श्री. वानखडे सर श्री. कहाते श्री. जगदीश नागले सर श्री. प्रभुदास गाठे, सौ. अनिता झाडखंडे श्री. साबुलाल धिकार व सर्व शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला गेला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे