Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…माध्यमिक विद्यालय धमक यांचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…माध्यमिक विद्यालय धमक यांचे आयोजन

 

MB-NEWSधामक ( पवन ठाकरे,प्रतिनिधी):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथिल माध्यमिक विद्यालय येते सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 7.30 ला ध्वज पूजन व ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक वाय बि बावने यांच्या हस्ते करण्यात आले नतंर गावात मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये माध्यमिक विद्यालय धामक व प्राथमिक मराठी शाळाचे विध्यार्थी सह विद्यार्थी बँड पथ हजर होते गावातील विविध ठिकाणी महात्मा गांधीजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन व हार अर्पण अनेक मान्यवर मंडळींनी हस्ते झाले .
ध्वज पूजन ध्वजारोहण त्यानंतर माध्यमिक विद्यालय धामक येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन व विद्येची दैवत सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ही श्री गणेशा रेकॉर्डिंग नृत्य म्हणून सुरू करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 5 ते 10 च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविंला होता.

कार्यक्रमां मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी समाज उपयोगी नाटक शेतकरी आत्महत्या करु नये झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड थांबावी स्वच्छता अभियान स्त्री भून हत्या गुटखा धूम्रपान तंबाखू सेवना मुळे काय परिणाम होईल अशा समाज उपयोगी कार्यक्रमा मधून संदेश गावकऱ्यांना दिला आहेत .
गावातील उत्कृष्ट प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला आहेत त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाय बी बावणे व राठोड सर,भोयर सर,अडतकर सर, काकडे मॅडम,सुलताने मॅडम,सचिन ढोले,धनंजय येवतिकर,मोहन मेश्राम ,मोरे सर व गावातील संपूर्ण पदाधिकारी व अधिकारी गावकरी मंडळी महिला मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे