Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

येथे संजीवन समाधी सोहळा..उद्या दहिहांडी व शोभायात्राने दूमदूमणार, घुईखेड नगरी मध्ये भक्तांचा जनसागर उसळणार

 येथे संजीवन समाधी सोहळा..उद्या दहिहांडी व शोभायात्राने दूमदूमणार, घुईखेड नगरी मध्ये भक्तांचा जनसागर उसळणार

MB-NEWS (चांदूर रेल्वे):– चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री संत बेंडोजी बाबा संजीवन समाधी सोहळा २२ ते २९ जानेवारीपर्यंत सुरू आहे. याच दरम्यान कथा वाचन सुरू असुन आज २८ जानेवारीला रामकथा समाप्ती होणार आहे. या संजीवन समाधी सोहळ्यात आरतीचा मान तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी, एसआय शर्मा व कर्मचारी तसेच अन्नदाते अथर्व मेघे, पवन बंड (नागपुर) यांना देण्यात आला होता. उद्या रविवारी दहिहांडी व शोभायात्राने घुईखेड नगरी दुमदुमणार आहे. यानंतर यात्रा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आणि विदर्भातील एकमेव संजिवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी संजिवन समाधी घेतली होती. यानंतर ६८६ वर्षांपासून समाधी सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. महोत्सव निमित्त उद्या रविवारी भव्य यात्रा भरणार असून या बेंडोजी महाराजाच्या संजिवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसागर लोटणार आहे.

आठ दिवस वेगवेगळे किर्तनकारांचे किर्तन व खंजरी भजन झाले. शेवटच्या दिवशी उद्या २९ जानेवारी रविवारी दुपारी १ वाजता नांदगाव खंडेश्वर येथील ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन सायंकाळी ४ वाजता गोपालकाला, दहिहांडी होईल. तसेच सायंकाळी ६ वाजता महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान बेंडोजी महाराजांची भव्य शोभायात्रा निघणार असून यात राज्यभरातील मोठ्या संख्येने आलेल्या दिंड्या सामिल होतील. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटणार आहे. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. रविवारपासून यात्रा महोत्सवाला देखील प्रारंभ होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त बाळासाहेब देशमुख, प्रविण घुईखेडकर, राजाभाऊ चौधरी व इतरांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे