निधन वार्ता:-अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूं डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज पुणे येथे निधन झाले
अमरावती :-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज पुणे येथे निधन झाले. मागिल कुलगुरूंचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीने कुलगुरू म्हणून दिलीप मालखेडे यांच्या नावावर ११ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्कामोर्तब होते.
डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याकरीता जी धोरणे आखलीत, ती सर्वांकरिता दिशादर्शक ठरली आहेत.

