आमदार बच्चू कडू यांचा शाखा अभियंत्यावर संताप‎ का संतापले बच्चू कडू…

आमदार बच्चू कडू यांचा शाखा अभियंत्यावर संताप‎
का संतापले बच्चू कडू…

अमरावती : अचलपूर मतदारसंघातील चांदूर‎ बाजार तालुक्यातील करजगाव‎ येथे जलसंपदा विभाग अमरावती‎ मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून पूर‎ संरक्षण योजनेंतर्गत बोहर्डा‎ नदीपात्रात पूर संरक्षक भिंतीच्या‎ सुरू असलेल्या कामाचा‎ आमदार बच्चू कडू यांनी आढावा‎ घेतला. यावेळी त्यांनी काही‎ तांत्रिक बाबींवर नाराजी व्यक्त‎ करीत शाखा अभियंत्यावर संताप‎ व्यक्त करत त्यांची शाळा घेत‎ कामाबाबत काही सूचना दिल्या.‎

पूर संरक्षक भिंतीच्या कामाचा‎ आढावा घेताना नदीपात्रातील‎ एका बाजुची संरक्षक भिंत पाहून‎ त्यांनी नदीच्या पाण्याचा प्रवाह‎ योग्य होणार नाही, याबाबत शंका‎ उपस्थित केली. प्रारंभी‎ कामाबाबत त्यांनी काही योग्य‎ निर्देश दिले. पुलाजवळील नदीचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पात्र कमी झाल्यास पाणी थांबून‎ गावात जाण्याची भीतीही व्यक्त‎ केली. मात्र अभियंत्यांनी तांत्रिक‎ बाबी लक्षात आणून दिल्यानंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आ. कडू यांनी तत्काळ योग्य त्या‎ सुधारणा करण्याचे निर्देश‎ अधिकाऱ्यांना दिले. या वेळी‎ उपविभागीय अभियंता अनिल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मेश्राम, शाखा अभियंता सतीश‎ सरोदे, पदाधिकारी सुरेश‎ गणेशकर, सुरेश भेंडे, संदीप‎ घुलक्षे, नितीन चौधरी, संजय‎ वसु, राहुल भेंडे, देविदास म्हाला,‎ सचिन सोलव, तय्यब खाँ भाई,‎ तसलीम भाई, बबलु भाई, महादेव‎ मनोहरे आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे