Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जिद्द, चिकाटी, परीश्रमातुन तो झाला न्यायाधीश….माजी आमदार केवलराम काळेंनी केला सत्कार

जिद्द, चिकाटी, परीश्रमातुन तो झाला न्यायाधीश….माजी आमदार केवलराम काळेंनी केला सत्कार

MB-NEWS अक्षय अथोटे
मेळघाट, चिखलदरा प्रतिनिधी:-मोठे झाल्यावर आपण न्यायदानाचे काम करायचे हाच ध्यास मनात बाळगून त्याने रात्रंदिवस विधिचा अभ्यास केला व जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमातुन पहिल्याच प्रयत्नात तो न्यायाधीश झाला.

अंजनगाव सुर्जी येथील राजकुमार फरकुंडे यांचा मुलगा ॲड.वैभव राजकुमार फरकुंडे यांनी उत्तुंग यशाला गवसणी घालत हे यश संपादन केले.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ॲड.वैभव फरकुंडे हे पहिल्याच प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश या पदावर नियुक्त झाले आहेत. अतिशय जिद्दी व मेहनती असलेल्या वैभव यांनी हे यश अद्वितीय आहे.आज मुलगा न्यायाधीश झाले समजल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरललेला नाही.
अंगी जिद्द व चिकाटी असेल तर प्रत्येक परिस्थितीवर मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून वैभव यांच्या कारकिर्दीकडे संपूर्ण राज्य बघेल.सर्व सुविधा, दर्जेदार अभ्यासाच्या सुविधा, मार्गदर्शक सर्व काही असून देखील अनेकांचे न्यायाधीश बनण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहते आहे. मात्र ॲड.वैभव राजकुमार फरकुंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश खेचून आणत परिवाराची मान उंचावली आहे. न्यायाधीश,ॲड.वैभव राजकुमार फरकुंडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मेळघाट चे माजी आमदार केवलराम काळें यांनी त्यांचा सत्कार केला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे