“मोबाईलचे दुष्परिनाम ” विद्यार्थ्यानी साकारली अभिनयातून भूमिका…..श्रीमती कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल घुईखेड मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन.
MB-NEWS(घुईखेड):-आजच्या धका धकीच्या जीवना मध्ये पालक वर्गा कडे विदयार्थ्यांना शिक्षणा कडे आकर्षित करण्या करीता मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर केला जातो.परंतू अती वापरा मुळे मुलांच्या जिद्दी पणा वृत्ती मध्ये वाढ झाल्याचे आणि बाहेरील खेळ, पुस्तकी ज्ञान, एकल पणाची विद्यार्थ्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या स्नेहसंमेलन मध्ये वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अभिनयातून भूमिका साकारली.
श्रीमती कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल घुईखेड येथे दिनांक ०८/०२/२०२३ पासुन ते ११/०२/२०२३ पर्यंत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये दिनांक ०८/०२/२०२३ रोजी स्वयं शाषित शाळा, वर्ग सजावट व चित्रकला स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेदिनांक ०९/०२/२०२३ रोजी खेळ, निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले, दिंनाक १०/०२/२०२३ रोजी रांगोळी स्पर्धा, पुष्प गुच्छ प्रदर्शन, उपक्रम कलाकृती स्पर्धा , आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.आणि शनिवार दिनांक ११/०२/२०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा करीता अध्यक्ष म्हणुन श्रीमती कमलाबाई ब.टावरी बहु उद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. प्रेमकुमार ब. टावरी , प्रमूख पाहुणे म्हणुन श्री. प्रशांत विठ्ठलराव भेंडे, सभापती पंचायत समिती चांदुर रेल्वे ,शाळा प्रमुख तथा मुख्याध्यापक श्री. रूपेश पांडुरंगजी भोयर पालक वर्गातून श्री. मंगेशजी इंगळे (निमगव्हान) यांनी पद भूषविले.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संगीतातून आपल्या भारत देशातील तथा महाराष्ट्र राज्यातील नृत्याचे सादरी करण केले. देशभक्ती नृत्य, नाटक, वेशभूषा, आदिवासी नृत्य, मराठी लावणी नृत्य, सांस्कृतिक नृत्याचे विद्यार्थ्यानी सादरीकरण केले. वर्ग चौथी चे विद्यार्थ्यानी सादर केलेले आदिवासी नृत्य सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक शिक्षिका सौ. अंकिता गोळे व सहाय्यक शिक्षिका सौ. अल्का भगत यांनी केले. संस्थे बाबत माहिती व वार्षिक अहवाल सहाय्यक शिक्षिका सौ. मनीषा बनकर यांनी मांडले.
खेळ, चित्रकला स्पर्धा, उप्रमक कलाकृती, रांगोळी स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या विदयार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सदर बक्षिस वितरणाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. स्मिता डखरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका कु. पुजा गुल्हाने यांनी केले.
कार्यक्रमाचे पूर्णत्वास नेण्यासाठी करीता सहाय्यक शिक्षिका सौ. सुवर्णा गावंडे, सौ योगिता वानखडे, कु. शितल मडकवाडे शारीरिक शिक्षक विशाल शंकरपाळे शालेय कर्मचारी नलू जूनघरे, सौ. वंदना गावंडे, अतुल राजगुरे, व राजु घुगरे यांनी परिश्रम घेतले.

