ग्रीन फाउंडेशन तळेगाव ठाकूर कडून तालुकास्तरीय स्पर्धा पडली पार 

 ग्रीन फाउंडेशन तळेगाव ठाकूर कडून तालुकास्तरीय स्पर्धा पडली पार 

MB-NEWS (सुनिल घोरमाडे):- ग्रीन फाउंडेशन तळेगाव ठाकूर कडून रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेमध्ये वय वर्ष 12 ते 21 वयोगटातील तालुक्यातील विविध गावातील सुमारे 150 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्रजी पालीवाल यांनी परीक्षा केंद्रावर प्रमुख उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन, परीक्षेचे स्वरूप याविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा यामागील महत्त्वाचा उद्देश होता.

त्याचप्रमाणे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ग्रीन फाउंडेशन तर्फे शालेय जीवनात उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे वाटप बक्षीस म्हणून केले जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या शुभ दिनी करण्याचे आयोजित केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गावचे उपसरपंच सतीश दादा पारधी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रीन फाउंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे