Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

खरे शिवाजी महाराज मांडण्यासाठी.. 20 फेब्रुवारी ला सुषमा अंधारे चांदुर रेल्वेत शिवजयंती उत्सव सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

खरे शिवाजी महाराज मांडण्यासाठी..
20 फेब्रुवारी ला सुषमा अंधारे चांदुर रेल्वेत
शिवजयंती उत्सव सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदुर रेल्वे :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चांदुर रेल्वे च्या वतीने 19 आणि 20 फेब्रुवारी ला भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी होणाऱ्या शिवव्याखानाला संबोधित करण्याकरिता शिवशेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे येणार असल्याची माहिती आज शिवजयंती उत्सव समितीने पत्रकार परिषद देत दिली.

तालुक्यातील विविध समविचारी संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती स्थापन करीत दरवर्षी मोठया प्रमाणात शिवजयंती उत्सव घेऊन त्या मार्फत समाज प्रभोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प या उत्सव समिती तर्फे करण्यात आला आहे, त्याचीच सुरवात या शिवजयंती पासून होणार आहे त्याकरिता शिवसेनेच्या उपनेत्या व सर्व महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचे प्रबोधन करणाऱ्या सुषमाताई अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहे, या सोबतच मनोरंजनातून प्रबोधन म्हणून अकोला येथील प्रसिद्ध शिवपोवाडा गायक भगवान गावंडे यांचा कलासंच कार्यक्रम सादर करणार आहे. शहरात पहिल्यांदाच इतका भव्य स्वरूपात शिवजयंती चा कार्यक्रम होत असून तालुक्यातील अनेक समविचारी संघटनेने या उत्सवाला सहकार्य केले आहे, त्यामुळे भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम होणार असल्याचा विश्वास समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे, या कार्यक्रमाला प्रमुख निमंत्रित म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप हे राहणार आहे, दि 19 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता शिवाजी नगर येथील महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व पूजन करून भव्य मोटार बाईक रॅली काढण्यात येणार असून ती संपूर्ण शहरातून फिरणारा आहे, तर 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवव्याख्यान कार्यक्रम होत आहे या दोन्ही कार्यक्रमाला जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीने केले आहे, या वेळी पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, पस सदस्य अमोल होले, शिट्टू सूर्यवंशी, विनय कडू, स्वप्नील मानकर, सागर दुर्योधन, गजुभाऊ यादव, प्रा विजय रोडगे, कॉम्रेड विनोद जोशी, हर्षल वाघ, गोटू गायकवाड, नवीन तिखे, सुमेध सरदार, शेहजाद सौदागर, सतपाल वरठे, बंटी माकोडे, रुपेश पुडके,आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे