Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार..

दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार..

 

 महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार असुन 🧾 या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.

*सकाळच्या सत्रातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या वेळेत पुढील प्रमाणे बदल:*

◆ परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत
◆ परीक्षेची सध्याची वेळ सकाळी- 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत
◆ परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत
◆ परीक्षेची सध्याची वेळ -सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत
◆ सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत

*दुपारच्या सत्रामध्ये सुधारित वेळापत्रक*
◆ परीक्षेची सध्याची वेळ -दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
◆ सुधारित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत
◆ परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत
◆ सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत
◆ परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत
◆ सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे