Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धार्मिक तेढ पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवा शिवजयंती उत्सव समिती ; पोलिसांना दिले निवेदन

        धार्मिक तेढ पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवा
शिवजयंती उत्सव समिती ; पोलिसांना दिले निवेदन

MB-NEWS(चांदूर रेल्वे):- शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमाला संभोधित करायला येत असलेल्या श्रीमती सुषमा अंधारे यांचे जुने व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून समाजात जातीय व धार्मिक तेढ पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज छत्रपती शिवाजी उत्सव समिती तर्फे आज स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना देण्यात आले.

दि 19 व 20 फेब्रुवारी रोजी शहरात भव्य शिवजयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व त्या निमित्त आयोजित व्याख्यानमाले साठी शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे या शहरात येत आहे सायंकाळी 5 वाजता त्यांचे भव्य शिवव्याख्यान होत आहे पण त्या अगोदरच त्यांचे जुने विडिओ समाजमाध्यमांवर पसरवून शहरातील धार्मिक व जातीय वातावरण दूषित करण्याचे कार्य काही लोक करीत आहे, सुषमा अंधारे यांना शहरात पाय ठेऊ न देण्याची भाषा ते वापरत आहे अशा परिस्थितीत या समाज विघटकांवर लक्ष ठेवत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीने पुराव्यानिशी पोलीस स्टेशनला दिले असल्याचे उत्सव समितीने सांगितले आहे, उद्या शिवजयंती उत्सवाला काही गालबोट लागल्यास त्याची जबाबदारी संबंधित लोकांवर राहणार असल्याचेही यात म्हटले आहे.
यावेळी समितीचे डॉ सागर वाघ, शिट्टू सूर्यवंशी, शिवसेनेचे संजय चौधरी, गजानन यादव, निवास सूर्यवंशी, अमोल होले, सतपाल वरठे, विनय कडू, सुमेध सरदार, पंकज मेश्राम, देवानंद खुणे, राजू लांजेवार, विलास मोटघरे, भीमा पवार आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे