Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चना खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची..खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात प्रचंड गर्दी..रात्रीपासून शेतकरी नाफेडला नाव नोंदणी करिता रांगेत… शेतकऱ्यांचा रोष अनावर

चना खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची..खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात प्रचंड गर्दी..रात्रीपासून शेतकरी नाफेडला नाव नोंदणी करिता रांगेत… शेतकऱ्यांचा रोष अनावर

MB- न्यूज नांदगाव खंडेश्वर:-(पवन ठाकरे)

नांदगाव खंडेश्वर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात (नाफेड) कडून चना खरेदी करण्याकरिता रविवारी रात्री ९.०० वाजता पासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या प्रचंड अश्या गर्दीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नांदगाव खंडेश्वर येथील नाफेड आणि खरेदी विक्री संघाच्या अधिकाऱ्याकडून नियोजनाचा अभाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने शेतकी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयातच नाफेडचे सुद्धा कार्यालय असल्याने येथील अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त करीत मोठ्या प्रमाणात नारेबाजी केली या कार्यालयात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चना खरेदी करिता दरवर्षी नाव नोंदणी केली जाते परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची एकाच वेळेस प्रचंड गर्दी व धक्काबुक्की पहावयास मिळाली ना नियम ना नियोजन नाही कोणतीही शिस्त नाही शेतकऱ्याचा नंबर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी व प्रचंड गोंधळ आणि शेतकऱ्यांचा आक्रोश पाहुन शेवटी खरेदी विक्री संघाच्या अधिकाऱ्यांकडून नांदगाव खंडेश्वर येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले होते यावेळी पोलिसांना सुद्धा एवढी मोठी गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी खूप कसरत करावी लागल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु नंतर परिस्थिती निवडली भर उन्हातान्हात तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर रांगेत उभे असून पिण्याच्या पाण्यासह सावलीची कोणतीही व्यवस्था नाफेड कडून करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला नाफेडकडुन आधीच नियोजन पूर्वतयारी करून शेतकऱ्यांना कळविण्यात यायला पाहिजे होते परंतु त्यांच्याकडून अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे