माकडांच्या हैदोसाने परीक्षार्थी खोळंबले दोन गटातील वादात पिल्ल्याचा मृत्यू ; वनविभागाची मध्यस्ती

माकडांच्या हैदोसाने परीक्षार्थी खोळंबले
दोन गटातील वादात पिल्ल्याचा मृत्यू ; वनविभागाची मध्यस्ती

 

MB-NEWS चांदुर रेल्वे:-(बातमी विवेक राऊत यांची )

आज सकाळी 12 वि वाणिज्य विभागाचा पेपर सुरू असतांना स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये अचानक माकडांच्या दोन गटात हैदोस सुरू झाल्याने काही मिनिटे वर्ग 12 विचे विद्यार्थी खोळंबले होते शाळेतील शिक्षकांनीही स्वतःला वर्गात बंद करून घेतले होते त्यानंतर पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

सकाळी 11 च्या सुमारास येथील जीप हायस्कुल मध्ये 12 वीच्या वाणिज्य शाखेचा पेपर होता त्याचवेळी शाळेच्या छतावरील बसलेल्या माकडांच्या दोन गटांमध्ये एकच हैदोस सुरू झाला त्यात एका माकडाच्या पिल्याचा छतावरून पडून मृत्यू झाला त्यामुळे चिडलेल्या माकडीन ने गोंधळ करून सर्वत्र धुमाकूळ घातला त्या माकडाच्या पिल्लाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवरही तिने हल्ला चढवला त्यात एक शाळेतील कर्मचारी किरकोळ जखमी झाला माकडीचे उग्ररूप पाहून शाळेतील शिक्षकांनी स्वतःला का वर्गखोलीत बंद करून घेतले त्यानंतर आलेल्या पोलिसांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाच्या त्या मृत पिल्लाला शाळेच्या बाहेर आणले तेव्हा शाळेतील सर्व माकडे शाळेच्या बाहेर गेले आणि त्यानंतर शिक्षकांनी सुटकेचा श्वास टाकला. यावेळी विद्यार्थ्यांचा पेपर सुरू व्हायचा होता त्यानंतर लगेचच पेपरला सुरवात झाल्याने विद्यार्थ्यांनी सुरळीत पेपर लिहल्याची माहिती शाळेतील।शिक्षकांनी दिली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे