✍🏻 उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू; विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हि काळजी घ्यावी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे 2022-2023 शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्यापासून होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जाणून घ्या…
▪️ दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.
▪️ विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र आणि MSBSHE दहावीचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे.
▪️ परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
▪️ विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही.
▪️ उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक बरोबर टाकावा.
▪️ प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करावी.
▪️ पेपरमध्ये खाडाखोड करणे टाळावे.
▪️ प्रश्न बारकाईने वाचूनच उत्तर लिहावे.
▪️ प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. त्यानुसार वेळेचे नियोजन करावे.
▪️ तीन तासांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये अधिक दहा मिनिटे जोडण्यात आली आहेत.
▪️ विद्यार्थ्यांनी अतिदक्षता म्हणून अद्यापही पेपरचे वेळेपत्रक डाउनलोड केले नसेल तर https://bit.ly/3Y6Inj3 या लिंकवरून वेळापत्रक डाउनलोड करू शकता

