अविरत जनतेच्या सेवेसाठी झटणारा जनमित्र..तिवसा येथे ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अविरत जनतेच्या सेवेसाठी झटणारा जनमित्र..तिवसा येथे ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

MB-NEWS :-तिवसा ता.प्र.(नंदकिशोर मते):सर्वांची अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करून वेळप्रसंगी जीवाची बाजी लावून आपले आयुष्य कर्तव्यावर समर्पित केलेल्या व देशाच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणात ऊन-वारा-पाऊस कसलीही तमा न बाळगता रात्रंदिवस अविरतपणे देशाच्या प्रत्येक घरा-घरात विजसेवा पुरविणाऱ्या तमाम लाईनमन बांधवांचे केंद्र व राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार दि.४ मार्च हा दिवस लाइनमन दिन म्हणून घोषित करण्यात आला या अनुशंगाने तिवसा उपविभाग यांचे मार्फत लाइनमन दिन हा मोठ्या उत्साहात व आनंदाने समर्थ लाॅन तिवसा येथे पार पाडण्यात आला त्यामध्ये कामगार नेते अभिजित केचे यांनी सर्व जनमित्र(लाइनमन) यांना आपल्या भाषणातून आजच्या या लाइनमन दिनाचे महत्व पटवून दिले त्या नंतर लाइनमन दिनाच्या निमित्ताने तिवसा उपविभागतील सर्व जनमित्र (लाइनमन) यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष.म्हणून लाभलेले राजेश पाटील, साहेब उपकार्यकारी अभियंता,तसेच,तिवसा १ वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता श्री.बोंद्रे साहेब व सर्व अधिकारी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे