पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी जीवन प्राधिकरण च्या कार्यालयासमोर पेटवली होळी.अधिकारी हजर नसल्याने चोरी बांगडी चाही केला आहेर.

पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी जीवन प्राधिकरण च्या कार्यालयासमोर पेटवली होळी.अधिकारी हजर नसल्याने चोरी बांगडी चाही केला आहेर.

MB-NEWS:-अंजनगाव सुर्जी ता.प्र.(सुजित काठोळे)

अंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर येथे गेल्या तीन वर्षापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने त्रासलेल्या नागरिकांनी

अखेर आज होळीच्या दिवशी जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर होळी पेटवून व कार्यालयात कोणताही अधिकारी हजर नसल्याने अधिकाऱ्याच्या कार्यालयाला चोळी बांगड्या चा अहेर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चा निषेध व्यक्त केला.
अंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर, संगाई प्लॉट, बहिरे प्लॉट, रोकडे प्लॉट,वसुंधरा कॉलनी येथील नागरिक गेल्या तीन वर्षापासून जीवन प्राधिकरण चा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून निवेदने व अर्ज देत आलेले आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना मोटर लावून पाणी वर चढवावे लागते, ज्यामुळे नाहक पाणीपुरवठ्याच्या बिलासोबतच इलेक्ट्रिकचे बिल सुद्धा भरावे लागत असून हा दुहेरी दंड नागरिकांना भरावा लागतो. ज्यांच्याकडे मोटर उपलब्ध नाहीत त्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. तीन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण ने नागरिकांना 25 लाख लिटरची पाण्याची टाकी सुरू झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. पाण्याची टाकी सुरू होऊन सहा महिने उलटले तरीही उडवा उडवी ची उत्तरे जीवन प्राधिकरण चे अधिकारी कंत्राटदार यांच्याकडून नागरिकांना मिळत असल्याने आज होळीच्या दिवशी स्थानिक नागरिकांनी जीवन प्राधिकरण च्या कार्यालयासमोर होळी पेटवून जीवन प्राधिकरण च्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच निवेदन स्वीकारायला एकही अभियंता किंवा अधिकारी हजर नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंत्याच्या दाराला निवेदन चिपकवून दरवाज्यालाच चोळी आणि बांगडी चा आहेर केला.

यावेळी निषेध व्यक्त करताना प्रशांत कोल्हे, तीर्थराज बिजेवार ,प्रमोद राऊत ,रमेश तायडे ,माया मानकर ,भाऊराव साबळे, जानराव काळे ,अमोल कावरे, प्रदीप ढाबे ,नितीन काळे ,प्रवीण बोके, प्रवीण कोल्हे , सुरेश कुकडे ,नितीन काळे, विलास बारबदे, विलास शिंगणे,गणेश बुंदिले तेजस काळमेघ, नरेद्र राऊत ,अनिकेत काळे ,रामभाऊ काकड ,जयेश राऊत, उज्वल काकड, सुरेश राऊत ,घनश्याम डिके, यश मानकर, यश डिके, प्रणव कोल्हे, दिनेश राऊत ,पियुष कोल्हे, राम देशमुख , राजू बारब्दे .सह अनेक नागरिक जीवन कार्य जीवन प्राधिकरण च्या कार्यालयासमोर उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे