दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना रंगेहाथ अटक…

दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना रंगेहाथ अटक…

लातूर-:  पेन्शन ची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्या करिता लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी चक्क दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केल्याप्रकरणी लातूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकड़े
मिळालेल्या माहितीवरून यातील तक्रारदार यांनी दि.१४ मार्च रोजी लातूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली त्या तक्रारी नुसार त्यांचा चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून व त्यांची पेन्शन ची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्या करिता दि १४ मार्च रोजी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केली. थोड्या वेळाने लाच मागणी केलेली रक्कम घेवून तक्रारदार हे लोकसेवक यांना त्यांचे लातूर येथील कार्यालयात जावून भेटले असता प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी दारू व मटणाच्या पार्टी साठी मागितलेली लाचेची रक्कम 2,500/- रु. स्वतः पंचासमक्ष स्विकारली.
आलोसे यांना लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➖️ मार्गदर्शक:-
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
➖️सापळा पथक:-
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर व
टीम एसीबी लातूर
➖️ सापळा मदत पथक:-
भास्कर पुल्ली व अन्वर मुजावर
पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो,
लातूर व टीम एसीबी लातूर
➖️ तपास अधिकारी:-
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर – 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी – 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे