Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

संप करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची तरतुद; मेस्मा कायदा घाईत मंजूर..

संप करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची तरतुद; मेस्मा कायदा घाईत मंजूर..

 

 ➖️जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यातील कारभार ठप्प झाला.यानंतर मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई बडगा उगरण्यात येणार असून संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मंगळवारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) घाईत मंजूर केला. संप करणाऱ्यांना ताक्ताळ अटक करण्याची तरतुद करण्यात आली आहे.

➖️ *मेस्मा कायदा म्हणजे काय ?
मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असतो. 1968 मध्ये असा कायदा केंद्राने आणला, आणि महाराष्ट्राने 2017 मध्ये. बस सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर या सेवा थांबवल्या किंवा मोर्चा, आंदोलनांमुळे जर या सेवा विस्कळीत झाल्या, तर त्यावर कारवाई म्हणून मेस्मा कायदा लावण्यात येतो.

 6 आठवड्यांपासून ते 6 महिन्यांपर्यंत हा कायदा लागू होतो. आणि हा कायदा लागू केल्यानंतरही जर संप, आंदोलनं, मोर्चे सुरूच राहिले, तर विना वॉरंट आंदोलनकर्त्यांना यंत्रणा अटक करू शकतात. तुरूंगवास आणि दंडात्मक रक्कम भरण्याची तरतूद या कायद्यात आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे