जय सेवा कबड्डी कल्ब काजलडोह येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
अक्षय अथोटे
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी:-चिखलदरा तालुक्यतील काजलडोह येथे जय सेवा कबड्डी कल्ब काजलडोह तर्फे आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धाचे १६ मार्च रोजी गुरुवार ग्रामपंचायत काजलडोह च्या मैदानावर आयोजन करण्यात आले. आदिवासीबहुल ग्रामीण क्षेत्रातील युवकांना आपल्या कलागुणांना समोर ठेवण्यासाठी
जय सेवा कबड्डी कल्ब दरवर्षीच कबड्डी चे आयोजन करण्यात येते. रोख पारितोषिक प्रथम बक्षीस १५००० हजार, द्वितीय बक्षीस ९०००, हजार व तृतीय बक्षीस ५००० असे ठेवण्यात आले आहे.
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री. राजेश भाऊ सेमालकर प्रहार चे मोठे कार्यकर्ता, आणि ग्रामपंचायत सरपंच श्री. राजेश कवाडे, यांच्या हस्ते फीत कापून उद्धघाटन करण्यात आले आणि तिथे उपस्थित काजलडोह ग्रामपंचायत चे उपसरपंच राजेश अथोले, आणि भगतसिंग उईके, अमृतराव अथोटे, आणि रेंगु मराशकोल्हे, सुनील उईके, डोमा सरपंच, विनायक कवडे सामाजिक कार्यकर्ता प्रहार, बबलू पिपरदे रोजगार सेवक डोमा, अंकुश कवडे सदस्य ग्रामपंचायत काजलडोह, राजकुमार बेलकर, अक्षय अथोटे पत्रकार मेळघाट, योगेश कवडे रोजगार सेवक, कमलेश राठोर उप सरपंच काटकुंभ, तेजस मराशकोल्हे निक्षय पथोटे,रामेश्वर मारशकोल्हे अंकुश कवडे, आदी सह जय सेवा कबड्डी क्लबचे खेळाडू व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

