➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️️
करार कर्मचारांचा संपाला पाठिंबा सर्व शिक्षा अभियान ; जुनी पेन्शनसह कायमची मागणी..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
महाराष्ट्रातील बातमीपत्र (अमरावती):–सर्व शिक्षा अभियान अंतर्गत करार कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन साठी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या या संपाला आपला पाठिंबा दर्शविला असून प्रत्यक्ष संपात सहभागी न होता, काळ्या फिती लावून ते काम करीत असल्याचे सांगितले, पेन्शन सोबतच शासन सेवते कायम करावे यासाठी ची मागणी या करार कर्मचारी संघेतनेची आहे.

गेल्या 15 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात उच्चशिक्षित असून अत्यल्प पगारावर जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी विद्यादानाचे व विविध पदावर काम करीत आहे, आज 10 वि 12 वीचे पेपर सुरू असतांना करार कर्मचारी यांच्याच भरवशावर परीक्षा घेतली जात आहे, कस्टडी पासून बैठे पथक ते इतर जबाबदारीच्या कामावर करार कर्मचारी काम करीत आहे, राज्यभरात सर्व विभागाचे असे 1 लाख 40 हजार करार कर्मचारी असून अतिशय अल्प मानधनावर त्यांच्याकडून कामे करून घेतली जात असल्याची माहिती आहे, यासोबतच डायट चे विविध प्रशिक्षण, 1 ते 9 च्या विविध परीक्षा त्याचे नियोजन, राज्यावरून येणारे विविध उपक्रम या कर्मचाऱ्यांचा भरोवशावर लादल्या गेले आहे, आज जरी काळ्या फिती लावून या संपाला पाठिंबा दर्शविला असला तरी लवकरच ते प्रत्यक्ष या संपात सहभागी होऊन काम बंद आंदोलन करणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

कायमच्या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनेने आम्हाला साथ देण्याचे आश्वासन दिले आहे, तशी मागणीही त्यांच्या मागण्यांच्या निवेदनात आहे, त्यामुळे आम्ही सुध्दा लवकरच पूर्ण टाकतीनिशी या संपात सहभागी होणार असल्याचे विषय साधन व्यक्ती करार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धीरज जावळकर यांनी कळविले आहे.

