Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेकडो युवकांचा युवासेनेत जाहीर प्रवेश स्वप्नील मानकर यांचे नेतृत्व ; महाकाल ग्रुप चे पदाधिकारी

           शेकडो युवकांचा युवासेनेत जाहीर प्रवेश       
स्वप्नील मानकर यांचे नेतृत्व ; महाकाल ग्रुप चे पदाधिकारी

 

महाराष्ट्रातील बातमीपत्र (चांदुर रेल्वे ):– राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख मा.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चांदुर रेल्वे शहर आणि तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महाकाल ग्रुप च्या समस्त पदाधिकारी आणि सदस्यांनी युवासेनेचे पश्चिम विदर्भ विभागीय सचिव सागर देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख स्वप्निल मानकर, कट्टर शिवसैनिक पप्पू उर्फ राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला.

दिनांक २० मार्च २०२३ रोजी युवासेना चांदूर रेल्वे शहर आणि तालुक्याची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, होऊ घातलेल्या निवडणूका व असेच नागरिकांचे मूलभूत प्रश्नांवरील आंदोलने या विषयावर आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला युवासेनेचे शैलेश चव्हाण, सुमित झंझाड, युवासेना चां.रे. तालुकाप्रमुख श्याम खाडे, शहरप्रमुख अजिंक्य पाटणे हजर होते. यावेळी आकाश देशमुख, राम बावनथडे, शुभम तायवाडे, विक्की कुपाले, शुभम टाळखंडकर, मयूर मेश्राम, सचिन तांडेकर, रुपेश फरकुंडे, अक्षय जांभोरकर, निलेश भोयर, अक्षय राऊत, गौरव सोनोने, किशोर वलतरे, अजय भाले, आदेश खोडके, अनिकेत मारबदे, शुभम राऊत, आदित्य भैसे, बंटी धनाडे, नरेश सुपटकर, आकाश सुर्यवंशी, कैलास मेश्राम, अक्षय मेश्राम, अविश मोरे, मनिष मेश्राम, अमन भेंडे, साहिल मेश्राम, रोहित वाकोडे, मंगेश फरकुंडे, पवन पंधरे, मंगेश बावनथडे यांसह असंख्य युवकांनी युवासेनेत जाहीर प्रवेश केला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे