नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेस चा भव्य चक्का जाम राहुल गांधी यांची खासदारकी रद्द प्रकरण माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे नेतृत्व

नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेस चा भव्य चक्का जाम
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द प्रकरण
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे नेतृत्व
MB-NEWS नांदगाव ख. (ता. प्र ):- पवन ठाकरे
काँग्रेस चे नेते व खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करीत माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर
येथे काँग्रेस च्या वतीने चक्का जाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले, एकीकडे खोटे प्रमाणपत्र असल्याचा निकाल दिल्यानंतर खासदारकी रद्द होत नाही फक्त काँग्रेसचेच नेते लक्ष केले जात असल्याचे सांगत आज येथील बस स्टँड चौकात भव्य चक्का जाम करण्यात आला.
आज दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याबाबतचा निकाल येताच जिल्ह्यातील काँग्रेस मंडळी मध्ये प्रचंड चीड उफाळून आल्याचे दिसून येत असतानाच आज प्रा वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले, या चक्काजाम मुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली असून त्यामुळे बसेस आणि गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, पोलिसांनी मध्यस्थी करीत माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेत नंतर सोडण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष निशिकांत जाधव, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धवसे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, सुनील शिरभाते, सुनील इंजळकर, संजय भगत,परीक्षित जगताप,दीपक सवई, आशिष चव्हळे, मोरेश्वर दिवटे, तनवीर पटेल,हारून भाई, ईद्रीस भाई, अशोक खंडार, गौतम सोनवणे, मुमताज भाई,प्रशांत देशमुख,विनोद जगताप,विजय चिंचे,नितीन मोरे, सुधीर पाटेकर, बाळासाहेब इंगळे, रघुपती गावंडे, प्रदीप ब्राह्मणवाडे,अशोक देत, नरेंद्र थोरात, सीमा जाधव,उषा देशमुख, असे अनेक शेकडो कार्यकर्ते महिला आणि उपस्थित होते.

भाजपला समर्थन देणारे खासदार अमरावती च्या नवनीत राणा, जय सिद्धेश्वर महाराज सोलापूर यांचे बोगस प्रमाणपत्र सिद्ध झाले असतांना त्यांच्यावर कुठलेही कारवाही झाली नाही, हा कुठला न्याय असा संतप्त सवाल यावेळी माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांनी उपस्थित केला. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची व विरोधकांची मुस्कटदाबी असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे