Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

६३ हजार शिक्षकांसाठी गूड न्यूज! ३४२७ शाळांना आजपासून २० टक्के अनुदान; पगार वाढणार…

६३ हजार शिक्षकांसाठी गूड न्यूज! ३४२७ शाळांना आजपासून २० टक्के अनुदान; पगार वाढणार…

▪️ राज्यातील तीन हजार ४२७ विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना २० टक्क्यांचा अनुदानाचा टप्पा मंजूर झाल्यामुळे ६३ हजार १८० शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दूर होणार आहे.

▪️ तरुण वयात शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर शाळेतील मुलांना शिकवता शिकवता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काही शिक्षक आले, पण २० टक्क्यांच्या अनुदानाचा टप्पा मिळाला नव्हता. त्यामुळे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील त्या सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते.

▪️ राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची दखल घेत त्यांना अनुदानाचा टप्पा देण्याची ग्वाही दिली आणि काही दिवसांतच शासन निर्णय काढला. पण, आता अनुदान दिल्यानंतर २०२२-२३ ची संचमान्यता केली जाईल. त्यावेळी आधारकार्ड असलेल्या आणि ‘सरल’ पोर्टलवर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार वाढीव नवीन शिक्षक पदांना मान्यता मिळणार आहे.

▪️ *शिक्षणाधिकाऱ्यांच्या हाती अंतिम निर्णय*
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अनुदानाचा वाढीव टप्प्यास पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव मागवून घेतले आहेत. संबंधित शाळांना शिक्षणाधिकारीच अनुदान मंजूर झाल्याचा आदेश देणार आहेत. दुसरे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून वेतन अधीक्षकांना पाठवले जाणार असून त्यानंतर शिक्षकांना दरमहा वाढीव वेतन मिळणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे