निलंबित उपनिरीक्षकाने महिलेला I Love You म्हटले आणि जमावाने त्याला चोप चोप चोपले; छ. संभाजीनगरमधील घटना..

निलंबित उपनिरीक्षकाने महिलेला I Love You म्हटले आणि जमावाने त्याला चोप चोप चोपले; छ. संभाजीनगरमधील घटना..

▪️ अवघ्या दीड महिन्यापूर्वी नशेत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूरबन कॉलनीतील उघडकीस आला आहे.

▪️सविस्तर माहिती अशी की, ४ एप्रिल रोजी पीडित महिला त्यांच्या घरात असताना निलंबित उपनिरीक्षक अनिल बोडले महिलेच्या घरासमोरून जात असताना महिलेला पाहून ‘आय लव्ह यू’ असे दोन वेळा म्हटले होते. त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला चांगलंच झापलं. परंतु तरीही तो तसाच उभा राहिल्याने पीडितेने आपल्या घराचा दरवाजा बंद केला.

▪️काही वेळाने पीडित महिला गल्लीतल्या इतर महीलांबरोबर गप्पा मारत असताना अनिल बोडले बुलेट वर तेथे आला अन् त्याने आधी महिलेला ‘आय लव्ह यू’ म्हटलं आणि महिलेचा हात धरला. दरम्यान याबाबत कॉलनीवासीयांना माहिती मिळताच त्यांनी या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला बेदम चोप दिला आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी देखील त्याने दारूच्या नशेत असाच प्रकार केला होता. अनिल बोडले असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे