अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्यशाळा शिबिर संपन्न
MB-NEWS ता. प्र.अक्षय अथोटे (चिखलदर):-अचलपुर तालुक्यातील पथ्रोट येथे दिनांक ४ अप्रैल रोजी अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनाचे कार्यशाळा शिबिर संपन्न झाली,या कार्यशालेला अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मनोहररावजी सुने साहेब हे देखील उपस्थित होते.अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना या संघटनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले असून हि संघटना महाराष्ट्र,मध्यप्रदेश,राजस्थान ,गुजरात ,दिल्ली ,पश्चिम बंगाल या राज्यांमाध्ये कार्यरत आहे .पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असूनही पत्रकारांचा सुरक्षित्तेचा विचार अजूनपर्यंत हि कोणी केलेला नाही.परंतु अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनने पत्रकारांचे विमा काढण्याचे ठरविले आहे.
त्याच बरोबर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना हि शाषण दरबारी नोंद होणारी पहिली संघटना ठरणार आहे अशे यावेळी बोलतांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहररावजी सुने साहेब यांनी सांगितले .त्याच बरोबर ग्रामीण भागातील पत्रकार यांना होणारा त्रास त्यांचा समस्या अशा प्रकारचा विविध विषयावावर या कार्यशाळे मध्ये चर्चा करण्यात आले असून संघटनेचे पदाधिकारी यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले, पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस वर आयोजित या कार्यशाळेला अचलपुर तालुका सह,अंजनगाव सुर्जी, परतवाड़ा,चिखलदरा ,धारणी, अमरावती,दर्यापुर येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

