शिवणगाव आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्धवसाहतीचे बाबासाहेब आंबेडकर नगर करण्यात आले नामकरण
MB-NEWS (तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:14 एप्रिल2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अति उस्तवात शिवणगाव फत्तेपूर येथे साजरी करण्यात आली.भगवान गौतम बुध्द. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
त्यानिमित्ताने गावालागत बौद्ध वसाहत आहे. वसावतीला नाव नसल्यामुळे वेगवेगळ्या नावाने ही वसाहत ओळखल्या जात होती .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाव वसाहतीला फलक लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर असे नामकरण गावाच्या सरपंच सौं. प्रियंका चव्हाण व उपसरपंच श्री. नंदकिशोर पोलगावंडे यांच्याहस्ते करण्यात आले.
या नामकरण सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य सौं. संगीताताई राजेंद्र खडसे.ग्रामपंचायत सदस्य सौं. यज्ज्ञकलाताई सुरेश कठाडे.कैलास कठाडे. राजू खडसे. राजेंद्र खडसे शिवणगाव फत्तेपूर गावातील नागरिक उवस्थित होते.

