आ. बच्चुभाऊ कडू यांच्या पाठपराव्यामुळे….प्रत्येक शासकिय वसतिगृहावर आदिवासी मुला – मुलीसाठी व्यायामशाळा व वाचनालयाची होणार निर्मिती

आ. बच्चुभाऊ कडू यांच्या पाठपराव्यामुळे….प्रत्येक शासकिय वसतिगृहावर आदिवासी मुला – मुलीसाठी व्यायामशाळा व वाचनालयाची होणार निर्मिती

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली घोषणा

MB-NEWS :-(अक्षय अथोटे)चिखलदरा प्रतिनिधी:-मेळघाट मतदार संघातील परतवाडा शहरात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यासाठी राहण्याकरिता शासकिय वसतिगृहाची सुविधा म्हणून विकासाचा भिडू म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नांमुळे परतवाडा शहरामध्ये ४८० आदिवासी मुला – मुलीसाठी राहण्याकरिता मंजूर झालेले भव्य – दिव्य ४ शासकिय वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाले .यावेळी अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू ,राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, मेळघाट मतदार संघाचे आमदार राजकुमार पटेल, अमरावती जिल्ह्याचे खासदार सौ. नवनीत राणा, आ. प्रताप अडसड,माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, *सुरेश वानखडे* अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती,सावन कुमार* , सहायक जिल्हाअधिकारी तथा आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी. अमोल मेटकर,सहायक प्रकल्प अधिकारी धारणी.

गणेश रंभाड,प्रहार पक्षाचे बल्लू जवंजाळ ,प्रवीण पाटील प्रामुख्याने उपस्थितीत होते.या कार्यक्रमामध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू यांनी या भव्य – दिव्य शासकिय वस्तीगृहाच्या निर्मिती साठी गेल्या १० वर्षांत शासनस्तरा वर वेळोवेळी केलेला पाठपुरावा , आलेल्या अडचनिवर प्रकाश ही टाकला .यासोबतच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या समक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांनी आपल्या भाषणामध्ये आदिवासी मुला – मुलीसाठी प्रत्येक शासकिय वसतिगृहावर व्यायाम शाळा व वाचनालय निर्मिती ची मागणी केली .आणि विभागीय स्तरावर केजी ते पिजी पर्यंत शिक्षनाची नवीन संकल्पना लागू करण्याचे मनोगत ही व्यक्त केले .या संदर्भात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याची घोषणा ही केली.आदिवासी मुला – मुलीचे उजवल भवितव्य,आरोग्य व सर्वागीण विकासासाठी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी मांडलेल्या संकल्पनेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी हिरवी झेंडी दिल्याने आ. बच्चुभाऊ कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अंकुश जवंजाळ, भास्कर मासोदकर , छोटू तेलगोटे, पंजाब बेदरकर, युवा स्वाभिमान पक्षाचे उपेन भाऊ बचले ,मनीष अग्रवाल, बंटी केजडिवाल,रवींद्र गवई ,राजू लोहिया , रवी वानखडे आदी मोठया संख्येने उपस्थितीत होते .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे