मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना पित्याचा मृत्यू

 मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना पित्याचा मृत्यू

(बुलढाणा) :- बुलढाणाच्या मोताळातील कुरहा गोतमारा येथील व्यक्तीचा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटत असताना मृत्यू झाला आहे. काशीराम मंझा असे या पित्याचे नाव असून ते मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून घरी परत येत असताना त्यांना बुलढाणा-मलकापूर मार्गावरील एका वळणावर काल सांयकाळी ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ऐन दोन दिवसावर लग्न असताना ही दु:खद घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे