अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज
उन्हाळा संपण्यासाठी आता मात्र एका महिन्याचा कालावधी बाकी आहे. अर्थातच एका महिन्यानंतर देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. राज्यात देखील जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार आहे.”
मात्र मान्सूनची अनुभूती आत्तापासूनच नागरिकांना होत आहे. कारण की गेल्या महिन्यात आणि या महिन्यात सातत्याने अवकाळी पावसाचा धुमधडाका सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?
तसेच उत्तर भारतातील इतरही राज्यात पावसाची हजेरी लागली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यात तर हिमवृष्टी झाली आहे. आपल्या राज्यात देखील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट झाली आहे.
राज्यातील पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, उस्मानाबाद, नासिक या जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपिटीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या तज्ञांच्या माध्यमातून पुन्हा एक धक्कादायक हवामान अंदाज समोर आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 28 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

