Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरच जनतेचा सेवेत.आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोग्य विभागास सूचना.

ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरच जनतेचा सेवेत.आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोग्य विभागास सूचना.

MB-NEWS (तिवसा ता.प्र.)नंदकिशोर मते:-तालुक्यातील बरेच दिवसांपासून बहुचर्चित लक्ष लागून असलेले ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे आता लवकरच जनतेचा सेवेत सुरू होणार आहे.या करिता नुकतीच वणी ममदापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच मुकुंद पूनसे यांनी विभागाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेत उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.या वेळी आमदार ठाकूर यांनी तत्काळ तालुका आरोग्य यंत्रने सह जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधत ममदापूर येथे उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे लवकरात लवकर आणि जलद गतीने जनतेच्या सेवार्थ सुरू करून त्या ठिकाणी परिसरातील येणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्याचा सोईसुविधा मिळाव्या अश्या सूचना वजा इशारा दिला असून.आता लवकरच वणी ममदापूर, सुलतानपूर ,काटसुर ,इसापूर, नमस्कारी ,फत्तेपूर आदी गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोईसुविधा मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

कारण परिसरात कुठेहे आरोग्याच्या प्राथमिक सोईसुविधा सुद्धा मिळत नसल्याने नागरिकांना थेट तालुक्याच्या ठिकाणी तिवसा येथे यावे लागत होते.त्या मुळे नागरिकांची आर्थिक हानी होऊन वेळेत उपचार मिळत नव्हता त्या मुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत होते.परंतु आता लवकरच हे उपकेंद्र सुरू होणार असल्याने परिसातील नागरिकांना आर्थिक बचती सह आरोग्याचा सुविधा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळनार असून आरोग्याचे प्रश्न देखील सुटणार आहे.या वेळी तिवसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योस्ना पोटपिटे (देशमुख) माजी सरपंच मुकुंद पूनसे ममदापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम महात्मे आदी उपस्थित होते.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे